तारे लुकलुकताना का दिसतात?

स्पार्कल नावाचा जिज्ञासू तारा पृथ्वीवरून पाहताना तारे लुकलुकल्यासारखे का दिसतात, याचे कारण शोधतो.

स्पार्कलला एक प्रश्न पडला आहे: तो स्वतः बदलत नसताना पृथ्वीवरील मुलांना लुकलुकताना का दिसतो? उत्तर शोधण्यासाठी तो प्रोफेसर रेडियंटकडे जातो आणि ताऱ्यांच्या प्रकाशाच्या प्रवासाबद्दल शिकतो.

एकदा काय झाले, स्पार्कल नावाचा छोटासा तारा होता. त्याला नवे काही शिकायला खूप आवडायचे. एक दिवस तो म्हणाला, 'पृथ्वीवरील मुले म्हणतात मी चमचमतो, पण का?'

स्पार्कलची मैत्रीण ल्युना तरंगत आली. ती खेळायला आवडणारा तेजस्वी तारा होती. ल्युना हसून म्हणाली, 'कदाचित मुलांना तुझं नाव म्हणताना मजा येते. 'ट्विंकल, ट्विंकल, लिटल स्टार…' किती गोड वाटतं ना!'

स्पार्कलने आपल्या चमकदार टोकांना हलवले. 'मला वाटतं यात आणखी काही आहे,' तो म्हणाला. 'मी कारण शोधणारच!' तो ठाम होता.

तो ज्याला सर्वांत शहाणा तारा मानायचा त्या प्रोफेसर रेडियंटकडे गेला. 'प्रोफेसर रेडियंट!' स्पार्कलने हाक दिली. 'माझ्याकडे एक प्रश्न आहे!'

प्रोफेसर हसले. 'नमस्कार, स्पार्कल. आज इथे कसा?' त्यांनी विचारले. 'पृथ्वीवरील मुले म्हणतात मी चमचमतो,' स्पार्कल म्हणाला. 'पण मी काही बदलत नाही! तुम्हाला कारण माहिती आहे का?'

प्रोफेसर म्हणाले, 'तारे म्हणजे खूप दूर असलेली अग्नीची मोठी गोलं आहेत. ते रात्री आकाशात तेजाने चमकतात. पण त्यांच्या प्रकाशाला पृथ्वीवरील डोळ्यांपर्यंत यायला मोठा प्रवास करावा लागतो.'

'प्रकाश पृथ्वीपर्यंत येताना हवेतून जातो,' प्रोफेसर पुढे म्हणाले.

'हवेला थर आहेत—काही गरम, काही थंड,' ते म्हणाले. 'त्या थरांमुळे तुझा प्रकाश वाकतो आणि नाचतो. म्हणून तू चमचमत असल्यासारखा दिसतोस!'

स्पार्कल हसला. 'माझा प्रकाश नाचतोय का?' तो म्हणाला.

'होय,' प्रोफेसर म्हणाले. 'तुझा प्रकाश त्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत छोटासा नाच करतो.'

'अरे वा! म्हणूनच त्यांना वाटतं मी चमचमतो!' स्पार्कल हसला.

तेवढ्यात ब्लेझ नावाचा मजेशीर धूमकेतू शूंss करत गेला आणि चमचमती धूळ मागे टाकली. 'कोणी नाच म्हणाले का?' ब्लेझने विचारले.

ब्लेझने गोलाफिरकी घेतली आणि तारकाधूळ शिंपडली. 'ब्लेझ,' स्पार्कल म्हणाला, 'आम्ही मी का चमचमतो याची चर्चा करतोय.' 'अच्छा,' ब्लेझ हसला, 'मुलांना आनंद मिळत असेल तर मीही चमचमेन!'

आनंदित स्पार्कलने ठरवले की तो आणखी उजळ चमकेल. 'मी कदाचित खरा लुकलुकत नसेन,' तो विचारात म्हणाला, 'पण मुलांना हसू येत असेल तर मी सदैव चमकेन!'

त्या रात्री पृथ्वीवरील कुटुंबांनी आकाशाकडे पाहिले. चमचमत्या तारांकडे बघत त्यांनी गुणगुणले, 'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर…'

वर आकाशात स्पार्कल हसत होता. त्याला कळले होते की गोष्टी नेहमी दिसतात तशा नसल्या, तरी त्या अद्भुत असू शकतात.

तारे लुकलुकत असल्यासारखे का वाटतात? रात्री तारे चमचमताना दिसतात, पण अवकाशात ते शांतपणे चमकतात. पृथ्वीभोवती सतत हालचाल करणारी हवा त्यांच्या प्रकाशाला वाकवते, म्हणून तारे चमचमत असल्यासारखे दिसतात!

Marathi