ससा आणि कासवाची शर्यत

ससा आणि कासव डोंगराच्या माथ्यापर्यंत शर्यत लावतात. वाटेत ससा झोपी जातो, तर कासव हळूहळू पुढे चालत राहते.

ससा कासवाशी डोंगरावर जाण्याची शर्यत लावतो. वेगाने पुढे गेलेला ससा वाटेत झाडाच्या सावलीत झोपतो. कासव मात्र न थांबता चालत राहते. जागा झालेला ससा माथ्यावर पोहोचतो, तेव्हा तिथे कासवाला पाहून ओशाळतो.

ससा… ससा तो ससा, की कापूस जसा, त्याने कासवाशी, पैज लाविली। ससा तो ससा, की कापूस जसा, त्याने कासवाशी, पैज लाविली।

वेगे वेगे धावू, नि डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे, अपुली।

चुरुचुरु बोले, तो तुरुतुरु चाले, नि कासवाने, अंग हलविले।

ससा जाई पुढे, नि झाडामागे दडे, ते कासवाने, हळू पाहिले। वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना, चालले, लुटू लुटू, पाही।

हिरवी हिरवी पाने, नि पाखरांचे गाणे, हे पाहुनिया, ससा हरखला।

खाई गार चारा, घे फांदीचा निवारा, तो हळूहळू, तेथे पेंगुळला।

मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे, झाडाच्या सावलीत, झोपे।

झाली सांज वेळ, तो गेला किती काळ, नि शहारली, गवताची पाती।

ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा, नि धाव घेई, डोंगराच्या माथी।

कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई, निजला तो, संपला सांगे। ससा… ससा… ससा… ससा… ससा…

Marathi